जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखीने पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.२८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रागाच्या भरात किवा कुणी तरी तिला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सपोनि. रवींद्र बागुल हे करीत आहेत.