जळगाव मिरर | १५ जून २०२४
शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना १२ जून रोजी दुपारी १२.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी १३ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार १२ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवार १३ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.





















