जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२४
जळगाव महापालिकेचे अभियंता प्रसाद पुराणीक यांना दि.२ रोजी मारहाण झाली होती. त्यामुळे ते त्या दिवसापासून तणावात होते. त्यानंतर बुधवारी त्यांना अस्वस्त वाटू लागले व सौम्य हृदयविकाराचा धक्का बसला. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर एंजीयोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर महापालिकेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता प्रसाद पुराणीक यांना दि.२ रोजी काव्यरत्नावली चौकातील युनिट कार्यालयात भूपेश कुलकर्णी नामक व्यक्तीकडून मारहाण झाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या पाच दिवसांपासून आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. परंतु तरीही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे अभियंता प्रसाद पुराणीक हे तणावात होते. पुराणीक यांना बुधवारी मध्य रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना डॉक्टरांकडे नेऊन त्यांची रात्री तपासणी करण्यात आली.
तसेच सकाळी हदविकार तज्ञांकडे तपासणी करून त्यांचे हृदयाची नस संपूर्ण पणे ब्लॉक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर एंजीयोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, या घटनेमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून आज दि.९ रोजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.