
जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालय नेहमी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते या अनुषंगाने जळगाव जिल्हा सेव्हन अ साईड फुटबॉल असोसीएशनच्या मान्यतेने जळगाव शहरात ता. १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान “जी. एच. रायसोनी मेमोरियल सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या आहे. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या क्रीडांगणावर या स्पर्धा रंगणार आहेत. अशी माहिती जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली.
सदर स्पर्धेला जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे मौलाचे असे प्रायोजकत्व लाभले असून स्पर्धेसाठी लागणारे मैदान तसेच स्पर्धा विजेत्यांना तब्बल ३५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच जळगाव शहरातून उत्तमोत्तम व गुणवंत खेळाडू तयार व्हावेत आणि हे खेळाडू राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या दृष्टिकोनातून तसेच खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या अनुषंगाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातर्फे शुक्रवार ते रविवार रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत ही स्पर्धा रंगणार आहे तरी जास्तीत जास्त फुटबॉल रसिक प्रेक्षकांनी व नागरिकांनी या स्पर्धेचा आस्वाद घेऊन खेळाडूंचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्यातर्फे करण्यात आले आहे.