अमळनेर : विक्की उत्तम जाधव
देशातील अयोध्या येथे दि.२२ रोजी प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा होत असल्याने देशभरातील अनेक भाविक अयोध्या येथे जाण्यासाठी निघत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील अनेक संत देखील या भव्य कार्यक्रमात उपस्थिती देणार आहे.
अखिल भारतीय संत समीती निर्देशक मंडळचे सदस्य तथा अमळनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदीर संस्थानचे अध्यक्ष, मठाधीपती महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ जी महाराज यांना अयोध्या नगरीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा साठी राम मंदिर ट्रष्ट अयोध्या कडून निमंत्रन पत्र प्राप्त झाले. त्या अनुषंगाने महाराज अयोध्या कडे मार्गस्थ झाले असून,प्रवासाला जातांना महाराजांच मंदीर संस्थान कडून तसेच,रस्त्याने लागणारे निम,कळमसरे,मारवड,धार,अमळनेर येथे ग्रामस्थ व भावीकांनकडून स्वागत करण्यात आले.