जळगाव मिरर | ९ मार्च २०२४
पंतप्रधान योजनेतंर्ग मिळणाऱ्या पैशांची माहिती देत असलयाचा राग आल्याने दारुच्या नशेत असलेल्या गोकुळ एकनाथ मराठे यांनी रतन विष्णू महाजन (वय ६७, रा. नांद्रा खु. ता. जळगाव) यांना शिवीगाळ करीत कुन्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली. ही घटना दि. १ रोजी सायंकाळच्या सुमारास नांद्रा बस स्थानकावर घडली. या मारहाणीत रतन महाजन यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड गहाळ झाली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रतन विष्णू महाजन (वय ६७) हे वास्तव्यास आहे. ते गावातील बस स्थानक परिसरात तानकू काशीराम महाजन यांना पंतप्रधान योजनेतंर्गत मिळणाऱ्या पैशांची माहिती देत होते. गोकुळ मराठे याला त्याचा राग आल्याने त्याने दारुच्या नशेत रतन महाजन यांना शिवीगाळ करीम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या पायावर कुऱ्हाडीच्या दांडक्याने वार करीत गंभीर जखमी केले. या भांडणात रतन महाजन यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड कुठेतरी पडून त्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हरिषकुमार शिंपी हे करीत आहे.