जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील रोझलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये दि.24 रोजी आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात कॅनव्हास पेंटिंग, क्ले मॉडलिंग, पोस्टर पेटिंग , आर्ट मिरर वर्क, रांगोळी , ऐतिहासिक वास्तू ,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, कलाकृती, आकर्षकपणे बनवले . यावेळी प्रदर्शनात अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती देखील हुबेहुब कार्डबोद्वारे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने बनवली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन वरिष्ठ संपादक रवी टाले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन रवी टाले सर, भावना शर्मा संस्थेच्या अध्यक्षा रोजमिन खिमाणी प्रधान मॅडम , सोले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
रवी टाले सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्यात असलेले कलागुण, कलेचे महत्त्व याविषयी अधिकाधिक माहिती दिली व सृजनशील बना. असा संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता धर्मदाय आयुक्त साहेब गणे सर, अधीक्षक राजू पाटील सर यांच्या भेटीने झाली. त्यांनी मुलांच्या प्रश्नांना उत्कृष्ट उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या उपक्रमात विदयार्थ्यांचे क्रमांक काढण्यात आले. तसेच प्रत्येक प्रकारासाठी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देण्यात आले जेणेकरून विद्यार्थी अशा अनेक विविध उपक्रमात सहभागी होऊन आपले कलागुण दाखवतील. या प्रदर्शनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील सर यांनी शुभेच्छा दिल्या . अशा प्रकारे आर्ट अँड क्राफ्ट फेअर यशस्वीरित्या संपन्न झाला