जळगाव मिरर / २४ एप्रिल २०२३ ।
दोन दिवसापूर्वीच अक्षय्य तृतीयेच्या सणानिमित बाजार पेठेत सोने घेणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
आज 24 एप्रिल 2023 रोजी सोन्याचा जून वायदा 7 रुपयांच्या कमजोरीसह 59,838 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता तर चांदीचा मे फ्युचर्स किमतीत सुद्धा 274 रुपयांची घट झाली असून चांदी प्रतिकिलो 74,380 रुपयेवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्यांचा कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 55,650 रुपये
पुणे – 55,650 रुपये
नागपूर – 55,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 60,710 रुपये
पुणे – 60,710 रुपये
नागपूर – 60, 710 रुपये
सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.