जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा अंतर्गत दि. २७ ते ३० डिसेंबर दरम्यान क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. यात धावणे, गोळाफेक, कॅरम, बॅडमिंटन, गोणपाट स्पर्धा, तीपायी शर्यत, लिंबू-चमचा शर्यत , सूर्यनमस्कार, दंडबैठका, रींगटेनिस, लंगडी पळकी, मटकीफोड संगीतखुर्ची, दोरीवरील उड्या, कबड्डी या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यासाठी मेणबत्ती ज्वलन व बकेटबॉल या स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उदघाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक एल एस.तायडे यांनी मैदानाचे व क्रीडा साहित्याचे पूजन करून व श्रीफळ वाढवून केले. सदर स्पर्धा विद्यालयाचे मुख्याध्यापक एल एस तायडे, पर्यवेक्षक एस एम रायसिंग यांचे मार्गदर्शनात घेण्यात आल्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ए.एस.बाविस्कर, विनोद कोळी, पी.बी.मेंढे, एस डी.राजपूत, आर.ए. कोळी, योगराज सोनवणे, धनराज सोनवणे, पी. व्ही.बाविस्कर, एस.आर. शिरसाट, ए.डी.पगारे यांचे अनमोल सहकार्य लाभले यशस्वी आयोजनासाठी रतीलाल पाटील, कैलास सपकाळे, सागर हिवराळे, राजेंद्र सपकाळे यांनी परिश्रम घेतले. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून आणले होते विशेष म्हणजे इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यासाठी खास पदार्थ करून आणले होते त्याबद्दल मुख्याध्यापक यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला स्पर्धा अतिशय चुरशीने व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या स्पर्धेचे नियोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेश जाधव यांनी केले होते.