जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२४
गिरणानदी पात्रातून अवैध वाळू उचलत असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख याच्या पथकाने अचानक धाड टाकून वाळू माफिया विरुद्ध वाळू चोरीची कारवाई करत ५ डंपर, ५ ट्रॅक्टर- ट्रॉली, २ जेसीबी असा १ कोटी ५४ रुपये किंमतीची वाहने जप्त करून १० जणांनासह जप्त वाहन मालकांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रमुख वाळू माफीयासह अन्य दोन जण फरार आहेत. तालुक्यात वाळू माफिया विरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे अन्य वाळू माफीयाचे धाबे दणाणले आहे. पोलिसाच्या ताब्यातील ७ जणांना भडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गिरणा नदी पात्रात काही लोक बेकायदेशीर रित्या अवैध वाळू उपसा करुन तिची वाहतुक करीत आहे. या अवैध वाळू वाहतुकीची खात्री करुन खाजगी वाहनातून जावून पाहिले असता गिरणा नदी पात्रात एका जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर मध्ये वाळु भरताना तर अन्य एक जेसीबी नदी काठावर साठा करून ठेवलेली वाळू डंपर मध्ये भरताना दिसून आले वाळू चोरीची खात्री होताच सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या पथकाने धाड टाकली असता घटनास्थळी वाळूने भरलेले ५ डंपर, ५ ट्रॅक्टर व ५ ट्राली, २ जेसीबी जप्त करण्यात आले आहेत.
तर संशयित आरोपी संदीप मुरलीधर पाटील रा. वडगाव ता. भडगाव, अक्षय देविदास महाले रा. खालची पेठ भडगाव, प्रविण विजय मोरे रा. वरची पेठ भडगाव, मच्छींद्र गिरधर ठाकरे रा. वरची पेठ भडगाव ललित रामा जाधव रा. यशवंतनगर भडगाव, शुभम सुनिल भिल रा. यशवंतनगर भडगांव, रणजित भास्कर पाटील रा. महिदळे ता. भडगांव, रवि पंचर रा. पेठ भडगाव, गणेश मराठे रा. पेठ भडगाव, भोला गंजे रा. भडगांव व इतर जप्त वाहनाचे मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक तुषार देवरे, पो.ना. राजेंद्र निकम, पोहेकॉ भगवान पाटील, पोकॉ. विकास पाटील, विश्वास देवरे, महेश बागुल, चेतन राजपुत, सुनिल मोरे, श्रीराम कांगणे, समाधान पाटील, सुदर्शन घुले, राहुल राजेंद्र महाजन यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे