जामनेर : प्रतिनिधी
जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ रोजी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक दीपक मोहिते व पोलिस कर्मचाऱ्यांनी अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई केली.
या वेळी पाेलिसांनी ४ लाख २८ हजार रुपयांची गावठी दारू व रसायन नष्ट केले. पाेलिसांनी आज शहरातील बजरंगपुऱ्यातील विकास रमेश खामकर, गारखेडा येथील रामकृष्ण सोनू भील, भरत दामू भील व दीपक नथ्थू ठाकरे, हिंगणे बुद्रुक येथील रमेश सखाराम भील, गाडेगाव येथील आत्माराम तुळशीराम पवार, करमाड येथील शिवलाल किसन गायकवाड, बाबूलाल किसन गायकवाड, शहापूर येथील रवींद्र रंगनाथ सुरवाडे व विमलबाई रामदास भील, खडकी येथील ईश्वर मकडू भील, कापूसवाडी येथील ज्ञानेश्वर शांताराम राठोड, हरदास जगदेव बेलदार, सोपान अशोक कोळी व धनसिंग वीरसिंग राठोड यांच्यावर कारवाई केली.
या वेळी पोलिसांनी जवळपास ४ लाख २८ हजार ५० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व रसायन नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.