जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३
महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ जळगाव जिल्हा, श्री संत गाडगे महाराज परिट (धोबी) सेवा संस्था, भुसावळ यांचा वतीने २६ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजेला सभागृह लोकार्पण सोहळा व वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ जळगांव जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, श्री संत गाडगे महाराज परिट (धोबी) सेवा संस्था, भुसावळ अध्यक्ष रमेश ठाकरे यांनी केले आहे. मेळाव्यात वधू-वर व पालकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे यांनी केले आहे.
कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास, पर्यटन व पंचायतराजमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालक मंत्री गुलाबराव पाटील, अखिल भारतीय ( धाबी ) महा समाज राष्ट्रीयध्यक्ष बालाजी शिंदे, उत्तर प्रदेश लखनऊ येथील पीठाधीश्वर प. पू. अशोक महाराज तर मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे, अखिल भारतीय (धोबी) महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, जळगाव जिल्ह्यातील समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक किसनराव जोर्वेकर, अखिल भारतीय (धोबी) महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार मालविय (इटारसी), पुणे येथील माजी उपमहापौर सुरेशराव नाशिककर, महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ माजी प्रदेशाध्यक्ष विजयराव देसाई, भुसावळ माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, दिल्ली येथील एन. सी. पी. सेवादल राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग दीपक, संत गाडगे बाबा स्मारक बांधकाम समिती प्रदेशाध्यक्ष दिलीपराव शिंदे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मुंबई खंडपीठ रेल्वे दावा अधिकरण उपाध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती किशोर सोनवणे यांची राहणार आहेत. समाजातील वधू-वर व पालकांनी परिचय मेळावाला गाडगे महाराज मंदिर, लोणारी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड, भुसावळ येथे रविवारी २६ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजेला उपस्थित राहावे, असे आवाहन अरुण धोबी यांनी केले आहे.