अमळनेर : विक्की उत्तम जाधव
२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर तर्फे गड किल्ले व ऐतिहासिक स्थळे स्वच्छता मोहीमे अंतर्गत अंबरीश टेकडी, अंमळनेर येथे सकाळी 7 ते 11दरम्यान स्वच्छता अभियान राबवण्यात आले .
या स्वच्छता अभियाना अंतर्गत अंबरीश टेकडीवरील मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.या अभियानात संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षणार्थी व कर्मचारी सहभागी झाले. मा. प्राचार्य अनिल देव यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.श्री अंबरीश टेकडी ग्रुप अध्यक्ष मा आशिष चौधरी व ग्रुप सदस्य यांचे सहकार्य लाभले. या अभियानात संस्थेचे गटनिदेशक एस यु भागवत,ए डब्ल्यू दुसाने, व्ही पी वाणी ,बीजी माळी, सौ पीएस चौधरी ,सौ वाय एन राणे, किशोर जगताप, केजी माळी ,डी एस पाटील, मनोज चव्हाण, सचिन महाजन, साईप्रसाद सर, सागर पाटील अक्षय चौधरी इत्यादी कर्मचारी सहभागी झालेत.