जळगाव : प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हा समन्वयक आणि पुण्यातून राज्यभर प्रसिद्ध होणाऱ्या ग्रामगौरव मासिकाच्या पहिल्या युवती संपादिका कु.धनश्री विवेक ठाकरे यांनी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या बीएसस्सी (बॉटनी) पदवी परीक्षेत शेकडा ८१.४७ गुण आणि ९.४५ एवढा सीजीपीए मिळवत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्वायत्त महाविद्यालय असलेल्या एम.जे.कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस. एन. भारंबे,वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जयवंत मगर,डॉ.पूजा पांडे, डॉ.मारोती देशट्टीवार, प्रा.ओंकार साळुंखे,प्रा.गौरी वळवी आदींचे धनश्री ह्यांना मार्गदर्शन लाभले.
बीएसस्सी पदवी शिकतांना धनश्री ठाकरे ह्यांनी कोरोना काळात आपले वडील आणि महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) समाजाचे राज्य अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यातील धोबी समाजाची ऑनलाईन जनगणना करण्याचा उपक्रम राबवला होता त्यामुळे राज्य धोबी समाजाचा इम्पिरिकल डाटा संकलित करण्याचे काम त्यांच्या नावावर आहे.शैक्षणिक लौकिक मिळवत सामाजिक काम करणाऱ्या कु.धनश्री ठाकरे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.