जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
बुलडाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघाताची घटना सोमवारी पहाटे साडे ५ वाजेच्या सुमारास घडली. नॅशनल हायवे क्रमांक सहा चे चौपदरीकरणाचे काम करुन रस्त्यालगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना आयशरने चिरडल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चार मजूर ठार ते सात जण गंभीर जखमी झाले आहे. मलकापूर जवळील ग्राम वडनेर भोलजी उडानपुलजवळ हा अपघात झाला आहे.
यामधील मृतकांची नावे – प्रकाश मकु धांडेकर (26), पंकज तुळशीराम जांबेकर (19), राजाराम दादूजांबेकर (35) व अभिषेक रमेश जांबेकर (18) सर्व रा. मोरगड ता.चिखलदरा, जि. अमरावती. तर जखमींमध्ये दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांभेकर, अमर बजू , शाम भास्कर (सर्व. रा. मोरगड, 5.गुणी भुया भोगर भुया रा. बोरीमतोली तह. गढवा) अक्षय कुमार श्री कुमार भैय्या (रा. चिनीया तह. गढवा) सतपाल कुमार मलिकचंद (रा.बोरी मातोली) यांचा समावेश आहे.