जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे करीत सभा देखील घेतल्या आहे तर सरकारला दिलेली वेळ आता काही दिवसात संपण्यात येत आहे. यावर नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून सरकारला इशारा दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावं ही आपली मागणी असून सरकारला २४ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नाही. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा ओबीसीमध्ये आहे. १९६७ पूर्वी मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आधी आरक्षण द्यायला हवं होतं. ओबीसी आरक्षण त्यानंतर देण्यात आलं. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून देव सुद्धा रोखू शकत नाही. असा इशारा देखील दिला आहे.
ओबीसीमध्ये धनगर समाजाला वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळे त्यांना धक्का लागणार नाही. आपण ओबीसीमध्ये आहोत फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. मराठ्यांना इतक्या हल्क्यात घेऊ नका, मतांसाठी आमच्या पोरांचे मुडदे पडणार नाहीत याची काळजी घ्या. तुन्हाला मोठं करायचं मराठ्यांनी आणि त्यांनीच आरक्षण देणार नाही, अशी टीका त्यांनी राजकीय नेत्यांवर केली आहे.