जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२४
जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा वाढदिवस दि.२३ रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले.
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे जळगाव रेल्वे स्टेशन येथे गोरगरिबांना जेवण देण्यात आले. त्यावेळी भाजपा जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, भाजपा सहकार आघाडी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष निलेश झोपे, भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष लताताई बाविस्कर, भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अशपाक खाटीक, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल मिस्त्री, भाजपा युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख भूषण मनोहर जाधव, आकाश पारदे, राधेबाबा, जहागीर खान तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.