अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या नियमित घटना घडत असतांना एसटी व दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३० रोजी दुपारी १ च्या सुमारास मारवड रस्त्यावर प्रताप महाविद्यालयाजवळ घडली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील पिंपळे रोड भागातील वामन नगरातील रहिवासी प्रीतम गजमल शिंदे (४९) हे ३० रोजी नेहमीप्रमाणे दुचाकीने शेतीच्या कामानिमित्त बोरगाव येथे जाण्यास निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास धार रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळ अमळनेर-तांदळी एसटी बसची (क्रमांक एमएच ४०-एन ९०८२) धडक बसल्याने डोक्यास, तोंडास मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुकुंदा शिंदे यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.