जळगाव मिरर | २ ऑक्टोबर 2023
देशातील अनेक राज्यातील गणेश भक्तांनी बाप्पाला मनोभावे निरोप देताना अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या होत्या. बाप्पांच्या विसर्जनावेळी पाण्यात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र एका घटनेत गणपती विसर्जनावेळी १३ वर्षीय मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे. बुडालेला मुलगा तब्बल २४ तासानंतर जिवंत सापडला आहे. हि घटना गुजरात राजयोतील सुरतमध्ये ही घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये शनिवारी दुपारी अरबी समुद्रात १३ वर्षीय मुलगा जिवंत सापडला आहे. बाप्पाच्या विसर्जनावेळी हा मुलगा दुमास येथे भरतीच्या पाण्यात वाहून गेला होता. पण २४ तासाहून अधिक काळ समुद्रात असलेला मुलगा जिवंत सापडल्याने सगळेच चकीत झाले आहेत. लखन देवीपूजक असे मुलाचे नाव आहे. एका मच्छीमाराला हा मुलगा सापडला आहे. रसिक तांडेल हा मच्छीमार समुद्रात गेला त्यावेळी त्याला हा मुलगा दिसला. रसिक मासेमारीसाठी समुद्रात गेला त्यावेळी लखन त्याला एका मोठ्या प्लायवूडवर तरंगताना दिसला. त्याने गणेशमूर्तीचा आधार घेतला होता. मूर्तीचा आधारे तो मुलगा तरंगत होता. बाप्पाच्या मूर्तीमुळे तो बचावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मच्छिमाराला समुद्रात एक तरंगता प्लायवूड लांबून दिसला. त्याला संशय आल्याने त्याने बोट जवळ नेऊन पाहिले, तर एक मुलगा त्याचा आधार घेत तरंगत होता. हे पाहून त्याला धक्काच बसला’.गणपती विसर्जनावेळी मुलगा आपल्या कुटुंबियासोबत दुमास येथे गेला होता. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबियानी तो हरवल्याची तक्रार दुमास पोलिसात दाखल केली होती. मात्र आपला मुलगा आता सुखरुप घरी पोहोचल्याने कुटुंबियांना आनंद झाला आहे. बाप्पा मच्छिमार रसिक तांडेलच्या रुपाने आला अन् मुलाला वाचवले अशी चर्चा आता परिसरातील सुरु आहे.