जळगाव मिरर | ७ मार्च २०२४
महाशिवरात्री निमित्त देशभर अनेक धार्मिक उत्सव साजरे होत आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण असून जळगाव शहरात देखील माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील १ लाख शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष सिद्ध केले जाणार आहे.
जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे हे नेहमीच विविध धार्मिक सणाच्या वेळेस सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असता. यंदा देखील महाशिवरात्रीच्या माध्यमातून शहरातील शिवभक्तांना एक अनोळखी भेट त्यांच्या माध्यमातून देणार आहे. ती म्हणजे नेपाळ येथून तब्बल १ लाख रुद्राक्ष जळगावात विधिवत सिद्ध करून त्यानंतर शहरातील भाविकांना त्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जळगाव शहरातील शिवभक्तांनी स्वागत देखील केले आहे. हे रुद्राक्ष जळगाव शहरातील विविध शिव मंदिरात वाटप करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी केले आहे. ज्या शिवभक्तांना हे रुद्राक्ष हवे असतील त्यांनी ९१४५६ ७७७७९ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.