जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२४
भुसावळ रेल्वे डाऊन रुळाजवळ सुमारे अडीच महिने वयाचे पुरुष जातीचे बाळ रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याला आढळले. ही घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सुबहसिंग पृथ्वीराजसिंग मीना हे रविवारी पहाटे कर्तव्यावर असताना त्यांना डाऊन रेल्वेलाइनवरील झुडपात कापडात गुंडाळलेले बाळ रडत असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक आर. के. मीना यांना माहिती कळवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या बाळास तातडीने भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. या बाळावर उपचार सुरू आहेत. या बाळाला कुणी व केव्हा सोडले ? याबाबत माहिती अद्याप कळू शकलेली नाही. सुबहसिंग मीना यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे