जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक शहरात भीषण अपघाताची घटना घडत असतांना नुकतेच खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या भीषण अपघातात ४ जणाचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी असल्याचे समजते. महिंद्रा मॅक्स ही प्रवाशी वाहतूक करणारी कार (टेम्पो) वरील चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत जाऊन कोसळल्याने हा मृत्यूतांडव घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरंबा गावापासून लेगापाणी या गावाकडे जात असलेल्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटला अन् तीव्र उतारावरून वाहन थेट दरीत कोसळले. हा मोठा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी धाव घेतली. घटनास्थळी ग्रामस्थांनी बांबूची झोळी करत दरीत पडलेल्या वाहनातून जखमींना व मृत लोकांना बाहेर काढले. जखमींना तात्काळ म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दारासिंग कुवरसिंग चौधरी (वय अंदाजे 41, राहणार केला पाणी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार), धीरसिंग पुण्या पाडवी (वय 35, राहणार केलापाणी) हे दोघे जागीच ठार झाले तर साबलीबाई दारासिंग चौधरी (वय 38, रा. केलापाणी), कांतीलाल जेठ्या वसावे वय अंदाजे 30 वर्ष. रा. वाडीबार मोलगी तालुका अक्कलकुवा जि. नंदुरबार. या दोघांचा मसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहेत. सुनील दारासिंग चौधरी (चालक ),रा. केला पाणी व गोविंद उपसिंग वळवी, राहणार जुम्मट तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार. हे जखमी असून त्यांच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू