जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४
जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती देखील गभीर जखमी असल्याची घटना जळगावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील प्रेम नगर परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक गुणवंत पाटील हे पुष्पा गुणवंत पाटील (वय-६६) यांच्यासह त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे कोल्हे नगरमध्ये जात असतांना शासकीय आयटीआय जवळ आलेले असतान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकीवरील दाम्पत्य खाली पडले.
त्या वेळी त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.