जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४
गेल्या काही महिन्यापासून रस्त्यावर अनेक चारचाकी दिसत आहे पण यात मोठ्या पसतीस उतरलेली ह्युंदाईची क्रेटा हि चारचाकीची मोठी मागणी देखील होत आहे तर यंदाच्या २०२४ च्या सुरुवातील ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने क्रेटा कार लाँच करून केली. क्रेटाच्या फेसलिफ्टेड व्हर्जनला आधीच 60,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत.
आता कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी येत्या 11 मार्च रोजी क्रेटाची एन लाइन व्हर्जन कार लाँच करणार आहे. ही मिड-साइज एसयूव्ही असणार असून या कारचे पेटंट इमेज आणि स्पाय शॉट्स आधीच लीक झाले आहेत.
ह्युंदाई क्रेटा एन लाइन 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह बाजारात येईल. हे 5,500 rpm वर 158 bhp ची कमाल पॉवर आणि 1,500 – 3,500 rpm वर 253 Nm चे पीक टॉर्क आउटपुट देते. यात 6-स्पीड युनिट आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच युनिटसह गिअरबॉक्स असणार आहे. सध्या हे इंजिन फक्त 7-स्पीड डीसीटीसोबत मिळत आहे.
या कारच्या स्पोर्टियर व्हर्जनमध्ये काही यांत्रिक बदलही करण्यात येणार आहेत. उदाहरणार्थ, चांगल्या हाताळणीसाठी सस्पेंशन मजबूत केले जाईल. यासाठी कारमध्ये स्वतंत्र एक्झॉस्ट बसवण्यात येणार आहे. याशिवाय, कारमध्ये काही कॉस्मेटिक बदलही करण्यात येणार आहेत. नवीन बंपरसह कारला पुढील आणि मागील डिझाइन अधिक स्पोर्टी मिळण्याची शक्यता आहे. नवीन अलॉय व्हील्स असतील. तसेच, कारच्या ड्युअल-टोन पेंटेड रुफ ऑप्शनसह नवीन कलर स्कीम देखील सादर करेल आणि नवीन मॅट कलर देखील सादर करेल. कारच्या मागील बाजूस, एन लाइन बॅजिंग आणि फॉक्स डिफ्यूझरसह मागील स्पॉयलर आहे. कारच्या बाहेरील भागात लाल ॲक्सेंट देण्यात आला आहे.
यासोबतच कारचे इंटीरियरही स्पोर्टी टचसह अपडेट करण्यात येणार आहे. कारला नवीन एन लाइन स्टीयरिंग व्हील मिळते, जे लेदरमध्ये गुंडाळलेले आहे. डॅशबोर्डवर लाल इन्सर्ट आहेत आणि इन्फोटेनमेंट सिस्टम देखील लाल बेझलने वेढलेले आहे. यासोबतच एक नवीन गियर लीव्हर आहे, जो क्रेटाच्या एन लाइन व्हर्जनसाठी आहे.