जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२४
दिनांक 22 रोजी निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाला प्रलंबित असलेले तुतारी हे नवीन पक्ष चिन्ह म्हणून देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्या नंतर शरदचंद्रजी पवार साहेबाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले होते तसेच काल दिनांक 22 रोजी निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला देण्यात आले.
दिनांक 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्याललंय आकाशवाणी चौक येथे नवीन पक्ष मिळाल्या बद्दल तुतारी चे औक्षण करून व तुतारी वाजउण , पेढे वाटप करून व फटाके फोडून जल्लोष साजरा कारण्यात आला या वेळेस शरद पवार साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है, देश का नेता कैसा हो शरद पवार साहेब जैसा हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा विजय असो अश्या अनेक घोषणा देण्यात आल्या. यावेळी नविन पक्ष चिन्ह तुतारी ची पुजा ग्रामीण जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्रजी पाटील व महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते पुजा करुन तुतारी वाजउण जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्रजी पाटील , आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर , अशोक लाडवंजारी , वाय एस महाजन सर , रिंकू चौधरी , इब्राहिम तडवी सर , रमेश पाटील , उमेश पाटील , प्रतिभाताई शिरसाट , अशोक सोनवणे , मजहर पठाण , रमेश बारे , राजु मोरे , सुनिलभैय्या माळी , किरण राजपूत , ॲन्ड राजेश गोयल , हितेश जावळे , एस डी पाटील साहेब , भाऊसाहेब इगळे , ॲन्ड किरण शिंदे , सुहास चौधरी , चेतन पवार , समाधान धनगर , संजय चौव्हाण , संजय जाधव , रफिक शाह , आयाज शाह , चंद्रकांत चौधरी , बशीर शाह , मतिन सैय्यद ,बबलू आव्हाड , गणेश सोनार , रशीद पिजारी , रुफभाई शाह इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.