धरणगाव : प्रतिनिधी
शनिवारी चोपडा रोडवर गुटख्याची गाडी पकडल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली होती. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून साधारण दीड लाखांचा माल तर एक लाखाचे वाहन असा एकूण २ लाख ३१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले हे शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव येथे नियोजित कार्यक्रमासाठी येत होते. याचवेळी क्रीडा संकुलजवळ एक संशयित वाहन त्यांना आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात विमल गुटखा, सिगारेट, सुगंधी सुपारी यासह विविध पदार्थ आढळून आलेत. यावेळी पोलिसांनी संतोष राजेंद्र चौधरी (रा. धरणी चौक, धरणगाव) या संशयितास ताब्यास घेतले. संशयितास ताब्यात घेतल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी त्याच्या घराची देखील झाडाझडती घेतली. त्यात आणखी दोन-तीन पोते भरून माल आढळून आला होता.
1) 4950/- रु. किमतीचा विमल पान मसाल्याचे 25 पाकीट प्रत्येकी 198/- रुपये किमतीचे 2) 6732/- रु. किमतीचे विमल पान मसाल्याचे 36 पाकीट प्रत्येकी 187/- रुपये किमतीचे 3) 1078/- रु. किमतीचे ही 1 तंबाखुचे 49 पाकीट प्रत्येकी 22/- रुपये किमतीचे 4) 1188/- रु. किमतीचे व्ही 1 तंबाखुचे 36 पाकीट प्रत्येकी 33/- रुपये किमतीचे 5) 1440/- रु. किमतीचे करमचंद पान मसाल्याचे 09 पाकीट प्रत्येकी 160/- रुपये किमतीचे 6) 1792/- रु. किमतीचे सागर पान मसाल्याचे 14 पाकीट प्रत्येकी 128/- रुपये किमतीचे7) 240/- रु. किमतीचे के.सी.1000 जाफरानी जदचि 12 पाकीट प्रत्येकी 20/- रुपये किमतीचे8) 390/- रु. किमतीचे एस.आर.-1 सेंटेड तंबाखुचे 13 पाकीट प्रत्येकी 30/- रुपये किमतीचे 9) 43560/- रु. किमतीचे एकूण 10 पांढऱ्या गोण्या त्यात प्रत्येक गोणीत विमल पान मसाल्याचे प्रत्येकी 22 पाकीट प्रत्येकी 198/ रुपये किमतीचे 10) 58344/- रु. किमतीचे एकण 06 निळ्या गोण्या त्यात प्रत्येक गोणीत विमल पान मसाल्याचे प्रत्येकी 52 पाकीट प्रत्येकी 187/- रुपये किमतीचे 11) 7260/- रु. किमतीचे एकूण 10 लहान गोण्या त्यात प्रत्येक गोणीत व्ही 1 तंबाखुचे प्रत्येकी 22 पाकीट प्रत्येकी 33/- रुपये किमतीचे 12) 4576/- रु. किमतीचे एकूण 04 लहान गोण्या त्यात प्रत्येक गोणीत व्ही 1 तंबाखुचे प्रत्येकी 52 पाकीट प्रत्यकी 22/- रुपये किमतीचे 13) 100000/- रु. किमतीची पांढऱ्या रंगाची मारोती ओमनी व्हॅन (क्रमांक एम.एच.19 एल 804) असा एकूण 2,31, 550 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पो.शि. रावसाहेब पाटील यांनी फिर्याद दिली असून संतोष राजेंद्र चौधरी (वय 26, धंदा- पान दुकान, रा. धरणी चौक मराठे गल्ली धरणगाव), सचीन धर्मसिंग बयास (वय 24, धंदा मजुरी, रा. बालाजी गल्ली धरणगाव) या दोघांविरुद्ध गुरनं. /2022 भादवि कलम 188,272,273, 328, 34 सह कलम 59 फुड, सेप्टी अँड स्टन्डर्ड अक्ट 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करित आहेत.