जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२४
जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनद्वारे अधिकृत “जैन चॅलेंज चषक” जळगाव जिल्हा अंतरशालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४ चे आयोजन नुकतेच अनुभूती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या युग पंगारिया, दर्शिल मुनोत, वीरांश सुराणा, विघ्नेश कडगड, मितांश मुंदडा या विध्यार्थ्याच्या संघाने ११ वर्षाखालील गटात विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेमध्ये ११ वर्षाआतील वयोगटातील विध्यार्थी व विध्यार्थिनीच्या एकूण ३९ संघाने सहभाग नोंदविला होता. स्कूलमध्ये विजयी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विजयी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान उपस्थित विध्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि, या यशामागे या खेळाडूंनी घेतलेली मेहनत, त्यांच्यामध्ये असणारी कौशल्ये व क्रीडा शिक्षक संजय चव्हाण व दीपिका ठाकूर यांचे त्यांना लाभलेले उत्तम मार्गदर्शणामुळेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले आहे तसेच विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मारलेली मजल ही खरंच वाखाणण्याजोगी असून विध्यार्थानी या यशाने भारावून न जाता राज्य व राष्ट्रीय स्तरावर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा डंका कसा गाजवता येईल, याची आखणी सुरू करावी असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणालाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या सी.बी.एस.ई.बोर्डच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यांचे या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.