अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी२०२४ रोजी संपन्न होणाऱ्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे माहिती जनतेपर्यंत पोहोचलो पोहोचवण्याच्या उद्देशाने विद्रोही साहित्य संमेलनाची भूमिका व परंपरा याविषयीचे प्रबोधन पत्रकाचे तसेच प्रचार – प्रसार दालनाचे उद्घाटन मा.आ. कृषीभूषण साहेबराव पाटील,मा. आ. शिरीष चौधरी,मा.आ.स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील,खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ.अनिल शिंदे,स्वादिष्ट उद्योग समूहाचे संचालक निलेश पाटील,उद्योजक प्रशांत निकम,रोटरी चे संचालक कीर्ती कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात.राज्यभरातून अमळनेर येथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायला लोकप्रतनिधीं व प्रशासन अधिकारी म्हणून स्वागत व आदरातिथ्य करायला अमळनेरकरांसह आम्ही सज्ज आहोत.असे जाहीर केले केले. विद्रोही साहित्य संमेलन समितीचे प्रा. लिलाधर पाटील,रणजित शिंदे यांनी विद्रोही संमेलनात सर्वसामान्य वाचक, श्रोते, यासह जनतेचा सहभाग असावा या उद्देशाने प्रबोधन पत्रक तयार करण्यात आल्याचे सांगितले.श्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले.तर आभार बापूराव ठाकरे यांनी मानले.यावेळी अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक विजय शिंदे , न.प.चे प्रशासन अधिकारी अधिकारी संजय चौधरी,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.शैलाजा शिंदे यांचेसह मा.नगरसेवक प्रवीण पाठक,बाळासाहेब संदानशिव,माजी उपनगरध्यक्ष अनिल महाजन, सपंच समाधान पारधी तसेच अमळनेर व चाळीसगाव रोटरी क्लबचे प्रमुख पदाधिकारी, शहरातील मान्यवर व्यापारी बांधव,शिक्षक व युवांसह महिलांनी मोठ्या संख्येने प्रबोधन दालनास भेट देवून माहिती जाणून घेतली .
रोटरी उत्सव येथे विद्रोही साहित्य संमेलनाबद्दल उत्सुकता असणाऱ्या नागरिकांना आयोजन समितीचे पदाधिकारी सविस्तर माहिती देत आहेत. विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीचे गौतम मोरे, माईंड पार्लरच्या संचालिका दर्शना पवार, अशोक बिऱ्हाडे, डी. ए. पाटील, प्रा.डॉ.माणिक बागले, प्रा.विजय वाघमारे, सौ.पूनम पाटील, दत्ता संदानशिव, प्रेमराज पवार,भूषण भदाणे ,सोशल मीडिया प्रमुख अजिंक्य चिखलोदकर, दिपक संदानशिव, अजय भामरे, गौतम सपकाळे आंदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.