जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जय दुर्गा शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम लीनेस क्लब तर्फे ज्येष्ठ नागरिक श्रीमती सरलाबाई ललवाणी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व विजेते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले .यावेळी लिनेस क्लब अध्यक्षा दर्शना ललवाणी, लिनेस लताजी बनवट, उज्वला मुथा ,शिवानी बोरा आधी सदस्य उपस्थित होते.तसेच मुख्याध्यापक सागर कोल्हे सर ,महेंद्र पाटील सर, आणि ज्योती पाटील तसेच सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.