जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२४
जळगाव जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व समाजातील विविध समाज संस्था सर्वसमावेशक यांच्यावतीने समाज शिरोमणी, स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत संत गाडगेबाबा जयंती उत्सव विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी शहराच्या कोंबडी बाजार परिसर समाज मंडळ , खोटे नगर समाज मंडळ, कासमवाडी परिसर समाज मंडळ, हरी विठ्ठल नगर परिसर समाज मंडळ, जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळ, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य धोबी समाज सर्व महासंघ या विविध भागातून शोभा यात्रा संत गाडगेबाबा उद्यानात आल्या संत गाडगेबाबा उद्यानात संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन आमदार राजूमामा भोळे, जिल्हा समाज अध्यक्ष अरुण शिरसाळे, महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरविंद देशमुख, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात येवून मुख्य मिरवणुकीस सुरवात झाली.
प्रारंभी सजविलेल्या बग्गीत संत गाडगेबाबा यांची प्रतिमा, संत गाडगेबाबा यांची पालखी, संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे तसेच दशसुत्रीचे, स्त्रीभ्रूणहत्या जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव , जल वाचवा पृथ्वी वाचवा, शिक्षणाचे व पर्यावरणाचे महत्त्व याचे प्रबोधनात्मक चित्ररथ सहभागी होते मिरवणूक संत गाडगेबाबा उद्यान येथून स्टेडियममार्गे श्री शिवाजी पुतळा चौक , नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा टॉकीज चौक, जुने कोर्ट मार्गे संत गाडगेबाबा उद्यान येथे मिरवणुकीचा समारोप झाला मिरवणुकीत संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेतील भास्कर जुनागडे हे लक्ष वेधून घेत होते सुरेश ठाकरे यांनी लाठी काठीचे प्रात्यक्षिक सादर केले उद्यानात महाप्रसाद व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच उद्यानात रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळातर्फे बाल आश्रम येथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले सामान्य रुग्णालयात फळे वाटप करण्यात आली मिरवणुकीत असंख्य समाज बंधू भगिनी, व युवक यांचा सहभाग होता उद्यानात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अरुण शिरसाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, भास्कर वाघ, भूषण सोनवणे, शंकर निंबाळकर, अरुण राऊत, सुरेश ठाकरे, राहुल भालेराव, सागर सपके, भास्कर महाले यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात मिरवणुकीत सहभागी समाज संस्था पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा धोबी समाज मंडळाचे सचिव राजेश जाधव यांनी तर सहसचिव अरुण सपकाळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले