जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४
भुसावळातील ‘दैनिक तरुण भारत’चे उपसंपादक गणेश रामकृष्ण वाघ यांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, 5 रोजी सायंकाळी पाच वाजता नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने कै. कृष्णराव पाटील कोठवळे (नाशिकचे मुलकी व पोलीस पाटील) पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कारानंतर शुभेच्छांचा वर्षाव !
नाशिक येथील जुना आग्रा रोडवरील श्री कालिका मंदिर सभागृहात शुक्रवारी दुपारी ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, श्री कालिका देवी मंदिर संस्थान अध्यक्ष अण्णासाहेब व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील एका पत्रकाराची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात भुसावळ तालुक्यातील गणेश वाघ यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून गणेश वाघ हे पत्रकारीतेत कार्यरत आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.