जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एक ४५ वर्षीय रुग्ण कोरोना चाचणी झाल्यावर उत्तम असतांना आता चोपडा तालुक्यात शनिवारी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली असून या दोघांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात (आयसोलेशन) उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाधित रुग्ण ३५ ते ३७ वयोगटातील महिला असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहे. त्यांचे नमुने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यापासून चाचण्या वाढवल्या असून दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे.