
जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याचे चर्चा व पुण्यातून चंद्रकांत पाटील यांच्या वाढत्या तक्रारीनुसार आज सरकारने पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लावली आहे. तर अजित पवारांच्या गटातील ७ मंत्र्यांना पालकमंत्री पद देखील बहाल केल्याने आता अजित पवारांनी नाराजी दूर झाली असावी. तर चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मागणी मान्य अद्याप मान्य करण्यात आली नाही. छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे होते. त्यांना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार