जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२३
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना इडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसा आधीच दोन महिन्याची जामीन दिल्यानंतर हा जामीन अजित पवार गटाने मिळवून दिल्याच्या चर्चा राज्यभर सुरू होत्या पण नवाब मलिक अजित पवार गटात ती शरद पवार गटात जाणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते पण आज त्यांनी आपली भूमिका एका मोठ्या वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केली आहे.
नवाब मलिक म्हणाले की मी कोणत्याही गटात जाणार नसून मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सोबत म्हणजेच शरद पवार साहेबांसोबतच असून गेल्या 18 महिन्यांच्या काळात माझ्यासह माझ्या परिवाराला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. माझ्यावर गेल्या काही दिवसापासून दुर्धर आजारामुळे मला देखील मोठा त्रास होत आहे त्यामुळे शहरातील नामांकित डॉक्टरांकडून उपचार करून महिन्याभरात माझी प्रकृती सामान्य होईल असा यावेळी त्यांनी विश्वास देखील व्यक्त केला आहे