जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक संघटक यांच्या कडून लाल बावटा कार्यालय बळीराम पेठ जळगाव येथे देशात स्वतंत्रता हिरक महोत्सव जयंती निमित्त १५ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी 10:00 वाजेला राष्ट्रीय संरक्षण उद्योग युनियनचे वरिष्ठ नेता कॉम्रेड राजेंद्र झा यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करुन ध्वजाला मानवंदना देवुन सामुहिक राष्ट्रगीत झाले . नंतर जिल्हा कौंसिल ची मिटींग घेण्यात आली.
कॉम्रेड राजेंद्र झा यांना अध्यक्ष स्थान स्विकारण्यासाठी कॉम्रेड डि.एन. पाटील यांनी ठराव मांडला त्याला कॉम्रेड मंदाकिनी मोरे यांनी अनुमोदन दिले सर्वप्रथम देशाला स्वातंत्र्य मिळवुन देणार्या शहिदांना श्रदांजली अर्पण करण्यात आली. मिटींग मध्ये सद्याच्या राजकिय घडामोडी आणि विविध विषयांवर चर्चा झाली. देशाची आर्थिक स्थिती तसेच गरीब आणि श्रीमंत याच्यातील वाढते अंतर याबाबत चिंतन करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षे झाली तरी देशात गरीबी , आर्थिक विषमता, भ्रष्ट्राचार ,बेरोजगारी ,भुकमरी इ. समस्यांपासून जनता मुक्तता झाली नाही , गरीबी दुर व्हावी देशातील जनता सुखी व्हावी यांसाठी आपण प्रयत्न करावेत जनतेत जनजागृती करावी असू अनेक विषय जिल्हा कौंसिल मिटिंगात घेण्यात आलेत कार्येक्रमात कॉम्रेड राजेंद्र झा कॉम्रेड डि.एन. पाटील, काम्रेड जे. डी.ठाकरे , काम्रेड मंदाकिनी मोरे ,काम्रेड कालू कोळी , काम्रेड विठ्ठल बडगुजर, काम्रेड प्रल्हाद एरंडे ,देविदास बोंदार्डे ,नरेंद्र पाटील इ. सदस्य यानी आपले विचार मांडले कॉम्रेड कालू कोळी यांनी आभार मानले.