अमळनेर : विक्की उत्तम जाधव
गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्दशी पर्यंत अतिशय उत्साहात पार पडला अमळनेर शहरात गणेशउत्सव नगर परिषदेचे सुमारे ५०० ते ६०० गणेशउत्सवात मूर्ती संकलनासाठी तैनात करण्यात आले होते. अनंत चतुर्दरशीला काही मंडळांनी दिवसा मिरवणुका काढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत विसर्जन केले तर मोठ्या मंडळाच्या मिरवणुकाना सायंकाळी ६ वाजता सुरुवात झाली.
शहरातील धुळे रस्त्याकडून, सुभाष चौकातून, कुंटे रोडवरून, सराफ बाजरातून, राणी लक्ष्मीबाई चौकातून येणाऱ्या सर्व गणपती मिरवणुका दगडी दरवाज्याजवळ दाखल होत पुढे विसर्जन केले. तर वाडी चौक येथील मानाचा संत सखाराम माऊली गणेशोत्सव मंडळाची देखील वाजत गाजत निघाली सोबत, त्रिमूर्ती मंडळ आणि पानखिडकी येथील जय बजरंग मंडळाने मिरवणुकीत सजिव धार्मिक आरास ठेवल्याने या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.
मिरवणुका पाहण्यासाठी संपूर्ण सराफ बाजार परिसरात मोठी गर्दी झाली होती. अनेक मंडळात बँड पथकाच्या तालावर अनेकांनी ठेका धरला. रात्री १२ वाजेच्या आत जवळपास सर्वच मंडळांच्या मिरवणुकांचे विसर्जन झाले. प्रांताधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार सुराणा हे सर्वत्र फिरून नियंत्रण ठेऊन होते. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , डीवायएसपी सुनील नंदवाळकर, चोपड्याचे डीवायएसपी कृषिकेश रावळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह १६ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ४५० पोलीस कर्मचारी, १५० पुरुष व. महिला होमगार्ड, दोन एसआरपी पथक, दोन दंगा नियंत्रण पथक, दोन स्टॅकिंग फोर्स, १० एलसीबी पोलीस यांनी विसर्जनासाठी मेहनत घेतली. शहरातील काही चौक आणि महत्वाचे कॉर्नर, संवेदनशील भागात जादा फोर्स आणि तिसऱ्या डोळ्याची ( कॅमेऱ्याची ) नजर होती. शहरातील लोकप्रतिनिधी आणि मंडळातील ज्येष्ठ सदस्यांचे सहकार्य लाभले.