मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यात आज दुपारी खळबळ उडविणारी बातमी समोर आली होती. मुक्ताईनगरातील एका पुलाच्या रोडखाली महिलेचा मृतदेह प्लास्टीक कागदामध्ये गुंडाळून फेकलेले होते. ही घटना उघड होताच पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. या महिलेची अद्याप ओळख पटली नसली तरी पोलीस प्रशासनतर्फे ओळख पटविन्याचे प्रयन्त सुरु आहे. पण या घटनेत पोलिसांना महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगरात आज सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास सुकळी शिवारातील फरेस्ट कंपार्टमेंन्ट 516 कुंड ते डोलारखेडा जाणारे रोडचे पुला खाली पुर्णा नदीच्या सुखलेल्या पात्रात सिमोट खंबा क्र.02 व 03 च्यामध्ये बेशरमच्या झाडा झुडपातील अज्ञात मारेकऱ्याने काहीतरी अज्ञात कारणा वरुण, अज्ञात हत्याराने अनोळखी मयत स्त्री वय अंदाजे 30 ते 35 (नाव गाव माहीत नाही) हिस जिवे ठार मारुन तिचे प्रेत निळ्या रंगाच्या प्लास्टीक कागदामध्ये गुंडाळून फेकलेले होते. ज्या पांढ-या रंगाची नायलॉन गोनीत मृतदेह होता. त्यावर इंग्रजीत RAMJI INDUSTRIES PVT LTD AKOLA असे नाव लिहलेल्या गोणीमध्ये लाल रंगाच्या दोरीने गाठोडे बांधून हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. दरम्यान, अकोला येथील कंपनीचे नाव लिहिले असल्यामुळे संबंधित महिला अकोल्याची आहे का?, आणि तीचा मृतदेह रात्रीतून फेकून देण्यात आलाय का?, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यात मृतदेहाशी मिळत्या जुळत्या महिलेची मिसिंग अकोला जिल्ह्यात कुठं दाखल आहे का?, याबाबत पोलीस चौकशी केली जाणार आहे.
मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. परंतू मृतदेहाची अवस्था बघता हा खून साधारण तीन दिवसापूर्वी झाला असावा,असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. तसेच मृतदेह पूर्ण भूगलेला असल्यामुळे शरीरावरील मारहाणीच्या काही खुणा आहेत का?, हे व्यवस्थित समजू शकलेले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानंतरच महिलेचा खून नेमका कसा करण्यात आला आहे?, हे समजू शकणार आहे. दरम्यान, याप्रकरणी संदीप सुकदेव इंगळे वय-35 व्यवसाय पोलीस पाटील (सुकळी, रा. सुकळी ता.मु. नगर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत महिलेचे असे आहे वर्णन
डोक्यावर काळ्या व पांढऱ्या रंगाचे लांब केस, लाल व पांढ-या रंगाचा चौकळी डिझाईनचा टावेल गुंडाळलेला, रंगाणे गोरी, उंची 5 फुट, अंगात लाल रंगाचे ब्लाऊज, अंगात लाल पिवळ्या रंगाची साडी तिथे काट काळ्या रंगाचे, राखाडी रंगाचा परकर, दोन्ही पायात पांढन्या धातूच्या चेन पट्ट्या. त्यावर लाल रंगाचे डायमंड, डाव्या हाताच्या बोटामध्ये पांढया धातूची अंगठी त्यावर पांढऱ्या रंगाचे डायमंड (खडे) असलेली असे वर्णन आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.