जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक मोठ्या शहरात अनेक ठिकाणी जुगार अड्डे सुरु असतांना पोलिसांनी आता कारवाई सुरु केली असतांना मुंबईतील खार (पश्चिम) परिसरातील ओम पॅलेस, आंबेडकर रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून जब्बल ४५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून 34 लाख रुपये रोख रक्कम तसेच १ करोड १ लाख ५० हजार किमतीचे जुगार खेळण्याचे कॉईन्स हस्तगत करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मधील खार (पश्चिम) परिसरातील ओम पॅलेस, आंबेडकर रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्या सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत जुगार अड्ड्याचे ४ भागीदार, जुगार खेळण्यास ग्राहकांना मदत करणारे तीन जॉकी तसेच प्रत्यक्ष जुगार खेळणारे ३८ जण अशा एकूण ४५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात १२ महिला व ३३ पुरुषांचा सामावेश आहे.
गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 34 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच १ करोड १ लाख ५० हजार किमतीचे जुगार खेळण्याचे कॉईन्स पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात कलम ४ (अ) (ब), ५ जुगार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कक्ष ९ गुन्हे शाखाकडून केला जात आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक, पोनि सचिन पुराणिक, पोनि दीपक पवार, सपोनि उत्कर्ष वझे, सपोनि महेंद्र पाटील, पो.ह. राहुल पवार, पो.ह. विनय चौगुले, म.पो. शि. साधना सावंत, पो. शि. प्रशांत भुमकर, पो. शि. अमोल सोनावणे, पो. शि. शार्दूल बनसोडे, पो. शि. राकेश कदम, पो.ह.चा. अविनाश झोडगे यांनी पार पाडली.