जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२४
येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद विद्यालयात दि. २ रोजी जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन टॉवेल यांचा जन्मदिवस जागतिक चिंतन दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री यु बी जाधव होते . याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका सौ ए आर सोनवणे प्रतिमा याज्ञिक सौ विद्या कलंत्री स्काऊट विभाग प्रमुख श्री डी बी पांढरे स्काऊट शिक्षक श्री गिरीश भावसार गाईड प्रमुख सौ सारिका वाणी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डी . बी. पांढरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी चिंतन दिनाविषयी माहिती विशद केली तर शाळेतील संगीत शिक्षक श्री संजय क्षीरसागर श्री संजय पिले. यांनी बेडन पॉवेल तेरे बच्चे हम मानेंगे तुम्हारे नियम हे गीत सादर केले
याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट हर्षल दिनेश बडगुजर राज्य पुरस्कार प्राप्त गाईड कुमारी सेजल राकेश महाजन कुमारी हर्षदा अजय शिंदे इयत्ता आठवी ,अ , कुमारी पियुशा गिरीश जाधव इयत्ता दहावी ब यांचा मान्यवरांनी गुलाब पुष्प व पुस्तक रूपाने बक्षीस देऊन सत्कार केला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेतील स्काऊट शिक्षक श्री गिरीश भावसार, गाईड कॅप्टन सौ सारिका वाणी मॅडम यांनी केले. राज्य पुरस्कार चाचणी शिबिर भोर तालुका जिल्हा पुणे येथे झालेल्या राज्य पुरस्कार फेड चाचणी शिबिरातील अनुभव कुमारी पियुष्या जाधव हिने कथन केले श्री गिरीश भावसार यांनी भारतातील स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास विशद केला.
अध्यक्ष भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री यु बी जाधव यांनी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती पुरस्कार मिळवावा असा मनोदय व्यक्त केला. स्काऊट विभाग प्रमुख श्री डी बी पांढरे यांनी रामधून गीत सादर केले याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी स्काऊट व गाईड बहुसंख्येने उपस्थित होते तसेच स्काऊटर गायडर सर्व शिक्षक वृंद कर्मचारी रुंद उपस्थित होते