मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेत थेट मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत हनुमान चालीसा आंदोलन छेडलं. मात्र या आंदोलनावर वसंत मोरेंनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती. यामुळे मनसेमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. त्यानंतर मनसे नेते वसंत मोरे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. मधल्या काळात वसंत मोरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर मनसेनं तातडीने शहराध्यक्षपदावरून मोरे यांना हटवले. आणि मनसेने साईनाथ बाबर यांची निवड केली. त्यानंतर तात्काळ मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
त्यानंतर राज ठाकरेंची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तब्बल २ महिन्यांनी राज ठाकरे यांच्या तब्येत ठीक झाली आहे. आता राज ठाकरे पक्ष संघटनेत सक्रीय झाले आहेत. काल मुंबईत मनसे नेते, सरचिटणीसांची बैठक घेण्यात आली. मात्र काल या बैठकीनंतर घडलेला प्रसंग सर्वांच्या लक्षात राहिलं असा आहे. त्याचं झालं असं, बैठक आटोपून राज ठाकरे निघत असताना गाडी गेटबाहेर पडत होती. तेव्हा त्याठिकाणी काही कार्यकर्त्यांसह मोरे तिथे उपस्थित होते. तेव्हा लगेच गाडी थांबवून मोरे यांना राज ठाकरेंनी हाक दिली. त्यानंतर मोरे कारमध्ये पुढील सीटवर बसले.
त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना मोरे यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे. जेव्हा खडकवासल्याचे मनसेचे आमदार रमेश वांजळे साहेबांसोबत कारमध्ये होते. तेव्हा ताफा जात असताना वाहनांचा ताफा थांबला. त्यानंतर सुरक्षा रक्षक मला शोधत शोधत आले. अन् तेव्हा मी १० व्या नंबरवर माझी गाडी होती. बॉडीगार्डनं साहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला. मग मी पळत पळत पुढे गेलो. तेव्हा त्यांनी कारमध्ये बसण्यास सांगितले होते, अशी आठवण वसंत मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितली.