जळगाव मिरर | १० मार्च २०२४
देशात गेल्या काही दिवसापासून अनेक धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या आगरा शहरातून समोर आली आहे. चक्क एका महिलेने भांडणादरम्यान एका पुरुषाचा कान चावला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा कानच गिळला, असा आरोप महिलेवर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या आगरा येथील नगला पदीजवळ ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या नगला पदीच्या देवी नगर येथे रविंद्र यादवच्या घरांमध्ये अनेक कुटुंब भाडेतत्वावर राहतात. अशाच प्रकारे एक कुटुंब होतं . अशाच एका घरातील भाडोत्री रामवीर हा त्याच्या मुलाला ई-रिक्षाने शाळेत सोडवायला गेला होता. त्याने बाहेर जाऊन मेन गेटचा टाळा खोलला. त्यानंतर सकाळी सहा वाजता मुलाला शाळेत परीक्षेसाठी घेऊन गेला. मुलाला शाळेत सोडविण्याच्या घाईत तो गेटचा टाळा लावायलाच विसरला. याच गोष्टीवरून मोठं भांडण झालं.
दुसऱ्या एका घरात राहणाऱ्या संजीव आणि त्याची पत्नी राखीने गेटला टाळा न लावण्यावरून कडाक्याचे भांडण सुरु केलं. दोन्ही भाडोत्री एकमेकांना शिव्या देऊ लागले. एकमेकांची शिवागाळ सुरु असताना संजीवने रामवीर बघेलचा हात पकडला. त्यानंतर संजीवच्या पत्नीने रामवीरचा कानच चावला. संजीवच्या पत्नीने रामवीरच्या कानाचा तुकडा पाडला. या घटनेनंतर इतर भाडोत्री देखील वाद सोडवायला धावले. या भांडणानंतर महिला इतकी रागावली होती की, सर्वांच्या समोरच तिने रामवीरचा उजवा कानच चावला. राखीने रामवीरच्या कानाचा तुकडा पाडला. त्यावेळी भांडण सोडवायला आलेले पाहतच राहिले. भांडण सोडवायला आलेल्या लोकांनी महिलेला सर्जरी करण्यासाठी कानाचा तुकडा द्यायला सांगितला. तर या महिलेने कानाचा तुकडाच गिळला. या घटनेप्रकरणी ठाणे न्यू आगरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.