जळगाव : प्रतिनिधी
रक्तदान हेच श्रेष्ठदान हा संकल्प घेऊन दिनांक ४ रोजी स्मार्ट इलेक्ट्रिशियन व कॉन्ट्रॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था खेडी बु. तालुका जिल्हा जळगाव यांनी यांच्या व रेड क्रॉस ऑर्गनायझेशन यांच्या योगदानाने चित्रा चौक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .
या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ४४ लोकांनी रक्तदान केले.वरील नियोजन हे स्मार्ट इलेक्ट्रिकल महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद शिंपी, अनिल पाटील, कल्पेश खैरनार, सुनील भोसले, कल्पेश सोमानी, प्रदीप पाटील, जुबेर शेख, राम जेऊरकर, रविंद्र आगळे ,शरद पाटील ,प्रमोद भोळे, जहांगीर शहा, रविंद्र पाटील, विनायक अत्तरदे ,ईसरार खान, ,समीर शहा,पियूष कोल्हे, दिलीप भाऊ कोल्हे, पराग खडके सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले. रोहिदास बडगुजर जावेद भाई व तसेच रेड क्रॉस ऑर्गनायझेशन चे चेअरमन विनोद बियाणी व वैद्यकीय अधिकारी डॉ सोनवणे यांनी उत्तम रीतीने पार पाडले .