जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४
जळगाव शहरातील दुध फेडरेशन रोडवरील प्रगती प्री प्रायमरी स्कुलचे स्नेहसंम्मेलन नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी छ.शिवाजी महाराज मिरवणूक देखील काढण्यात आली होती. त्यात व मावळे डान्स विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बालसाहीत्यीका सौ.माया छुप्पड़ व विजय सोनार सपत्नीक उपस्थित होते. तसेच विना प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी देखिल उपस्थित होते. सर्वांनी काय चिमुकल्यांचे व शाळेचे खूप कौतुक केले. बक्षिस वितरणासाठी सैन्य दलातील विशाल सोनार व सौ.कविता सोनार, सीमा पिंगळे हे उपस्थित होते. आजी आजोबांसाठी घेण्यात आलेल्या ‘रंगतरंग’ कार्यक्रमात विशेष उत्साही असलेल्या आजी आजोबांना देखिल भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किर्ती इंगोले, समृद्धी सोनार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षिकांनी व प्रिंसीपल सौ.सुरेखा यांनी इतरांनी परिश्रम घेतले.