जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळा तर्फे १२ वीच्या परिक्षा आज दि. २१ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयातून ४८ हजार २७३ विदयार्थी प्रविष्ट झाले असुन ७८ केंद्रांवर या परिक्षा होणार आहे. परिक्षांची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात आली असुन उपद्रवी केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ होणार आहे. २१ फेब्रुवारीपासून १९ मार्च पर्यंत या परिक्षा असणार आहे. जिल्हयात २७ हजार ७६८ मुले तर २० हजार ५०५ मुली परिक्षेसाठी प्रविष्ट आहे. यात विज्ञान शाखेचे २५ हजार १३२, कला शाखेचे १६ हजार २४४, वाणिज्य शाखेचे १५२३ व आयटीआयचे ३२ विदयार्थ्यांचा समावेश आहे. बारावीच्या परिक्षांसाठी जिल्ह्यात ७८ परिक्षा केंद्र आहे. यात ३०८ कनिष्ठ महाविदयालयाचे विदयार्थी परिक्षा देणार आहे.
बारावीच्या परिक्षांसाठी बोर्डामार्फत १ जिल्हास्तरीय पथक असणार आहे. तर प्रत्येक तालुक्यता तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे प्रत्येकी एक पथक असणार आहे. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत देखील प्रत्येक तालुक्यात विभागप्रमुखांचे एक पथक असणार आहे.