जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२४
गेल्या काही वर्षापासून अनेक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असून या भीषण अपघातात नेहमीच अनेकांचे जीव जात आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथे एका ५ वर्षाच्या बालकाच्या डोक्यावरून स्कूल बसचे चाक गेले. या घटनेत बालकाचा जागीच मृत्यू झाला. हर्षद अनिल हातांगळे असे मृत बालकाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेनंतर बालकाचे कुटुंब शाेकसागरात बुडाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद याच्या डाेक्यावरुन तब्बल दोन वेळा चाक गेले. त्यातच तो चिरडला गेला. त्यामुळे निष्पाप हर्षदचा जीव गेला. यावेळी घटनास्थऴी माेठा जमाव जमला हाेता. हर्षद हातांगळे याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळताच त्यांच्या पायाखालची वाऴू सरकली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.