जळगाव : प्रतिनिधी
आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत स्त्रीयांना फार मानसन्मान महत्त्व देण्यात आलेले आहे. तसेच आपल्या संस्कृतीत कोणत्याही प्रकारच्या हिंसेला तसेच हिंसाचारी व्यक्तीला अजिबात थारा नाही. असे असताना सुद्धा गुजरात येथे सन 2002 मध्ये झालेल्या सामूहिक अत्याचार व सात निष्पाप लोकांच्या झालेल्या हत्या प्रकरणात अकरा आरोपी तुरुंगात होते मात्र गुजरात सरकार ने 15 ऑगस्ट रोजी या सर्व 11 आरोपींना माफी देऊन कारागृहातून सोडून दिलेले आहे.
या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी दि.18 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, येथे शहरातील मुस्लिम बांधव व भगिनींन तर्फे थाळीनाद आंदोलन करून महामहिम राष्ट्रपती सो. व महामहीम पंतप्रधान सो. भारत सरकार नवी दिल्ली यांना मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
महामहीम राष्ट्रपती हे स्वतः एक स्त्री असूनआपण कृपया या प्रकरणाकडे सहानुभूतीने बघावे व एका अत्याचार पीडित स्त्रीला व दुसरे जे निष्पाप लोक त्या दुर्दैवी घटनेत मारले गेलेले आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाकडे लक्ष देऊन गुजरात सरकारचा हा माफी चा हुकूमनामा रद्द करावा व या 11 नराधमांना पुनश्च तुरुंगात टाकून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी “रद्द करा रद्द करा माफीचा हुकूमनामा रद्द करा, झालीच पाहिजे झालीच पाहिजे आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, “अशा घोषणा देऊन जोरदार थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, सै. शिनीम बेगम अयाज अली, तबस्सुम बी रहीम, सै. शगुफ्ता नियाज अली, गझाला बी बशीर, नाझीम पेंटर, शेख जमील,सै. रियाझ अली, शफी ठेकेदार, शेख रागिब, अहेमद ठेकेदार, मुस्तकीम मुबारक बहेस्ती, शेख सलीम उद्दीन, तोसिफ कुरेशी, शेख शफीक अहमद, सलमान मेहबूब, रईस खान, वसीम खडसे, शब्बीर युसुफ, नईम खाटीक, झुलफिकार खान, अल्लाबक्ष बागवान, शमशुल मोहिनुद्दीन, शाहरुख जमील, वसीम शेख, इलियास नूरी, शेख आरिफ, शेख नूर मोहम्मद आदी उपस्थित होते.