जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३
भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या राहुल रामदास क्षीरसागर (वय ३५) रा. फडके खानावळ जवळ याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. १९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ. सुनील जोशी, विजय नेरकर, नीलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत चौधरी यांनी केली.