जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचे म्हटले असतांना आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकांची आचारसंहिता असणार असल्याच्या चर्चेवर बोलतांना जरांगे यांनी हे वक्तव्य केले आहे.
फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. तर, दुसरीकडे फेब्रुवारीपर्यंत राज्यात आचारसंहिता लागेल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, मराठा आरक्षण दिल्याशिवाय राज्यात निवडणुका होणार नाही असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, “आचारसंहिता कधी लागतील मला माहित नाही. मात्र 24 तारखेच्या आतच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागो की 25 ला लागो, आमचा निर्णय 24 डिसेंबरलाच होणार आहे. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर निवडणुका होत नसतात. त्यामुळे 24 डिसेंबरच्या आधीच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार आहे. फेब्रुवारी आता खूप लांब आहे असं जरांगे म्हणाले.