जळगाव मिरर | २६ नोव्हेबर २०२३
कार्तिकी एकादशिनिमीत्त रथोत्सव पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातून चोरट्यांनी पोत लांबवल्याची तीन घटना उघडकीस आल्या आहे. याप्रकरणी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून रथ काढण्यात आला होता. रथाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून भाविक जळगावात दाखल झाले होते त्यामुळे सायंकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत शहरातील दाणा बाजार परिसरात दर्शनासाठी आलेल्या पूनम भूषण कोळी (वय २३, रा. दीनकर नगर, असोदा रोड) या विवाहितेच्या गळ्यातून ८ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरट्याने चोरुन नेली. त्याच परिसरात रामेश्वर कॉलनी येथील पाणीपुरवठा ऑफिजळव राहणाऱ्या तनूजा रविंद्र भोई यांच्या गळ्यातून २ ग्रॅम वजनाची लांबवली. तसेच शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील सिमा प्रशांत पाटील यांच्या गळ्यातून चोरट्याने चार ग्रॅम सोन्याची पोत चोरुन नेली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या. त्यामुळे रथोत्सवात चोरट्यांची दिवाळीच साजरी झाली आहे. याप्रकरणी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन मंगलपोत चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एकमहिलेस दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केली जात आहे.