जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गेंदालाल मिल परिसरात काहीहि कारण नसताना तरुणाला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतीत शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील गेदालाल मिल मधील रहिवासी कुणाल अशोक हटकर (वय २६) हा तरुण आपल्या परिवारासह राहायला आहे. दि २२ रोजी कुणाल हा घराजवळ उभा असताना रात्री ८ वाजता शहारूक खान शब्बीर खान(चायना) हा दारूच्या नशेत येवून काही हि कारण नसताना कुणालच्या वडिलांना शिवीगाळ करत कुणाल याला जीवेठार मारण्याची धमकी. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात कुणाल हटकर याच्या तक्रारीवरून शहारूक खान शब्बीर खान याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहेत.